कल्याण-डोबिंवलीत यंत्रणा अपूरी पडते, आरोग्य मंत्र्यांनी धारावीसारखी पाहणी करावी- राजू पाटील

ठाणे | कल्याण-डोबिंवलीत यंत्रणा अपूरी पडत आहे. इथे टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, ट्रॅकिंग हा फॉर्म्युला औषध सापडत नाही. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी धारावीप्रमाणे कल्याण-डोंबिवलीचीदेखील पाहणी करावी, अशी मागणी कल्याण-डोंबिवली ग्रामीण मतदारसंघाचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवर केली आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. शहरात आज आणखी 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 49 वर पोहोचली आहे.

25 डोंबिवली पूर्व, 7 डोंबिवली पश्चिम, 9 कल्याण पूर्व, 7 कल्याण पश्चिम तर टिटवाळ्याचा 1 रुग्ण आहे. यापैकी 8 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीकडून बऱ्याच उपाययोजना केल्या जात आहेत. शहरातील किराणा माल आणि इतर जीवनाश्यक दुकाने सकाळी 5 ते दुपारी 2 वाजेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

 

महत्वाच्या बातम्या 

-“किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही”

-बीएमसीच्या मदतीसाठी अक्षय कुमार धावला, मास्क आणि टेस्टिंग किट्ससाठी केली इतक्या कोटींची मदत

-कामापेक्षा मोठा कोणता ‘धर्म’ नाही या गोष्टीची जाणीव झाली- सत्यजीत तांबेvvvvv

-बारामतीत ‘भिलवाडा पॅटर्न’ राबवा- अजित पवार

-कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर तसंच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट पगार; सरकारचा निर्णय