मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली आहे.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी धमकीचं पत्र आल्याचं सांगितलं आहे. तसेच माझ्यासोबत राज साहेबांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.

दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि बाळा नांदगावकर यांच्या सुमारे 20 मिनीट चर्चा झाली. यानंतर ते शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते.

बाळा नांदगावकर यांनी काल मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे आणि पोलिस सह आयुक्त (गुन्हे) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

सर्वोच्च न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय; राजद्रोहाचं कलम तूर्तास स्थगित 

सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी; सोनं-चांदी झालं स्वस्त, वाचा ताजे दर 

“सुदैव आहे तुमचं की तुम्हाला तुरूंगात दणके बसले नाहीत, तुम्ही त्यातच खुशी माना” 

मोठी बातमी! नवाब मलिक प्रकरणी एनआयएच्या तपासात अत्यंत धक्कादायक खुलासा 

ह्युंदाईची जबरदस्त इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार, पाहा लूक आणि फिचर्स