निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेलं राजकारण अत्यंत दुर्दैवी.. हे चांगलं नाही- राज ठाकरे

मुंबई |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र टाईम्सच्या कार्यक्रमात मुलाखत होत आहे. ही मुलाखत ठाण्यात पार पडते आहे. या मुलाखतीत पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला. निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेलं राजकारण दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली.

राज ठाकरे म्हणाले-

“महाराष्ट्रात स्थापन झालेलं सध्याचं सरकार दुर्दैवी आहे. कुणाच्या मदतीने कुणाचं सरकार आलंय? सगळ्यात जास्त आमदार असलेला पक्ष विरोधी पक्ष म्हणून विधानसभेत बसलाय. निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात जे काही पाहायला मिळाल ते अतिशय दुर्दैवी आहे.”

राजकारणाचा अर्थ निवडणुकीच्या पलीकडे आहे असं मला वाटतं. परदेशातील अनेक गोष्टी महाराष्ट्रात आल्या पाहिजेत. महाराष्ट्राकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन अत्यंत कलात्मक आहे. योगायोगाने मी राजकारणात आलो. घरात राजकारण होतं. त्यामुळे त्याची जरा सवय होती. कधीकधी राजकारण मला बटबटीत वाटतं, असंही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, निकाल लागलेल्या दिवशी मला फार आनंद झाला होता. ज्यांनी पक्षांतर केली होती ते तोंडावर आपटले होते. मी आनंदी होतो मात्र त्यानंतर जे काही झालं ते आपण सर्वांनी पाहिलं, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-अजितदादांकडे जादूची कांडी, ते 8 नगरसेवकांचे 60 करतील… काही सांगता येत नाही- चंद्रकांत पाटील

-जो शिवसैनिक नाणार रिफायनरीला समर्थन करेल त्याचं थोबाड फोडा- विनायक राऊत

-26 वर्षे लोकांना हसवतोय, मात्र आता माझ्यावरच रडण्याची वेळ आलीये; इंदोरीकर महाराज उद्विग्न

-राममंदिरामुळे लोक आपल्याला मतदान करतील या भ्रमात राहू नका- चंद्रकांत पाटील

-दिल्लीत हवं तसं घडलं नाही म्हणून दंगल भडकवली; शरद पवारांचा भाजपवर गंभीर आरोप