“…म्हणून मी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला”

मुंबई : ठाकरे सरकारचा विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव पार पडला.  169 आमदारांनी सरकारच्या बाजूने मतं दिली. तर चार आमदारांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मनसेचे आमदार राजू पाटील यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. बहुमत महाविकास आघाडीच्या बाजून जाईल हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे आम्ही बाजूनं किंवा विरोधात मतदान केलं असतं तर काही फरक पडला नसता, असं पाटील म्हणाले आहेत.

राज्याला सक्षम विरोधीपक्ष मिळावा ही राज ठाकरेंची भूमिका होती. त्यानुसारच आम्ही पुढं गेलो आहेत. आम्ही आमची भूमिका जोमानं पुढे मांडू. जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणणार आणि जे चूक आहे त्याला विरोध करणार, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, मनसेबरोबर माकप आणि एमआयएम हे पक्ष देखील तटस्थ राहिले. एमआयएमचे धुळ्याचे आमदार शहा फारूख अन्वर आणि मालेगावचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालीक हे दोन तर सीपीएमचे विनोद निकोले हे आमदार तटस्थ राहिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-