पुणे | मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) डॅशिंग नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला ‘रामराम’ केला आहे.
रुपाली पाटील राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधण्याच्या चर्चा असताना त्यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रुपाली पाटलांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची भेट घेतली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या दौऱ्यावर उद्या पुण्यात येत आहे. पण राज ठाकरे पुण्यात पोहोचण्याआधीच रुपाली पाटील ठोंबरे यांनी राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली. काही दिवसांपूर्वीच रुपाली पाटील यांनी पक्षातील अंतर्गत कलहामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे पक्षांतर्गत वादामुळे मनसेला रामराम ठोकल्याचं बोललं जात आहे.
रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. एकीकडे मनसेकडून पुणे पालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरू असताना रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, रुपाली पाटील या राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आल्या होत्या. कोरोनाच्या काळात कामानिमित्ताने अनेक वेळा रुपाली पाटील या अजितदादांच्या बैठकीला हजर होत्या.
रुपाली पाटील राष्ट्रवादी नेत्या कार्यक्रमाला आणि बैठकीला हजर राहिल्यामुळे त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र कामानिमीत्त त्यांची भेट घेतल्याचं रूपाली ठोंबरेंनी सांगितलं
रुपाली पाटील या मनसेच्या डॅशिंग नेत्या म्हणून ओळखल्या जात. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने मनसेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत असताना रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होणार; पुणे म्हाडाने केली ही मोठी घोषणा
‘हिंमत असेल तर…’; चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान
St worker strike | अनिल परब अॅक्शन मोडमध्ये; उचललं मोठं पाऊल
सोशल मीडियावर जॉन अब्राहमने उचललं धक्कादायक पाऊल!
“पत्नीने सेक्सला नकार दिल्यास दुसऱ्या महिलेसोबत सेक्स करण्याचा पतीला अधिकार”