“ही लोक डोक्यावर पडली आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला??”

मुंबई |  भाजपच्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शौचालयाला दिल्याचा आरोप करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी “ही लोक डोक्यावर पडली आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांच नाव शौचालयाला??”, अशी टीका ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी 4 मार्चला रात्री 10 वाजून 11 मिनिटांनी एक ट्वीट करत एका उद्घाटनाची माहिती दिली आहे. यामध्ये एका बहुउद्देशीय केंद्राचा तर अद्ययावत शौचालयाचा समावेश आहे. याच अद्ययावत शौचालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव भाजपने दिल्याचा आरोप करत मनसेने टीकास्त्र सोडलं आहे.

दुसरीकडे प्रसाद लाड यांनी ट्वीट केल्यानंतर त्यांचा नेटकऱ्यांनी जोरदार समाचार घेतला आहे. डोक्यावर पडलात का लाड? परत परत महाराजांचा अपमान करण्याचा विडा उचलला आहे का तुम्ही भाजपाच्या नेत्यांनी? असे सवाल करणारे अनेक ट्वीट नेटकऱ्यांनी केले आहेत.

तर लाड यांच्या ट्वीटमध्ये छञपती ‘शिवाजी महाराज बहुउददेशीय केंद्र व अद्ययावत शौचालय’, असं लिहिलंय.तुम्ही बहुतेक ( ” व ” ) हा शब्द वाचला नाही. असो… छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बहुउद्देशीय केंद्र याच्या पुरते च मर्यादित आहे. हे कृपया लक्षात घ्या, असा सल्ला देणारं ट्वीट एका नेटकऱ्याने केलं आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-सरकारी कर्माचाऱ्यांची खाती अ‌ॅक्सिस बँकेत वळवल्याचा फडणवीसांवर आरोप; कोर्टाने धाडली नोटीस

-नड्डाजी, खासदारकीचं तिकीट द्या बरं का- रामदास आठवले

-वक्तव्य मागे घ्या, अन्यथा… ब्राह्मण महासंघाचा सुजय डहाकेला इशारा

-सुजय डहाकेला कानफडण्याची सौरभ गोखलेची भाषा; काढली थेट लायकी!

-अण्णा हजारे यांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; पत्रात म्हणतात…