“मराठी माणूस ही घटना, त्यामागची माणसं आणि त्यामुळे भळभळलेली जखम कधीही विसरणार नाही..”

मुंबई |  मुंबईतल्या बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्समध्ये होणारं आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मोदी सरकारने गुजरातमधल्या गांधीनगर शहरात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने महाराष्ट्र स्थापना दिनीच हा निर्णय घेऊन एक प्रकारे महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. याचप्रकरणावर मनसेची रोखठोक भूमिका मांडत केंद्रावर टीकेचा बाण सोडला आहे.

महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून मुंबईतलं आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र गुजरातला हलवलं गेलं.. मराठी माणूस ही घटना, त्यामागची माणसं आणि त्यामुळे भळभळलेली जखम कधीही विसरणार नाही, अशी टीका मनसे नेते अनिल शिदोरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

अनिल शिदोरे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “मुंबईवरून गुजरात आणि महाराष्ट्राचा झगडा सर्वांना माहीत आहे.. त्यात ज्या दिवशी मुंबई महाराष्ट्राला मिळाली त्याच दिवशीचा मुहूर्त साधून मुंबईतलं आंतरराष्ट्रीय वित्त केंद्र गुजरातला हलवलं गेलं.. मराठी माणूस ही घटना, त्यामागची माणसं आणि त्यामुळे भळभळलेली जखम कधीही विसरणार नाही..”

दरम्यान, महाराष्ट्र दिनादिवशी महाराष्ट्रात मुंबईत होणारं आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मोदी सरकारने गुजरातला हलवल्यामुळे मराठी जनांमध्ये संतापाची लाट आहे. अगोदर मुंबईला गिळण्याचा प्रयत्न आणि गुजरातची महाराष्ट्रावर वाकडी नजर सहन केली जाणार नाही, अशा संतप्त भावना नेटकरी व्यक्त करताना दिसून येत आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘मातोश्री’ प्रवेशद्वारावरच्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण

-‘फडणवीसांना ट्रोल करणाऱ्यांना आवरा’; भाजपची पोलीस आयुक्तांकडे मागणी

-“आम्ही त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला, म्हणून आम्हाला सरकार वाचवता आलं नाही”

-‘मी काही गमावलं नाहीये…’; इरफान खानच्या पत्नीची काळजाला भिडणारी पोस्ट

-“आज गळे काढणारेच त्या वेळी सत्तेत होते, त्यांनी मुंबईच्या आयएफएससीसाठी शून्य योगदान दिलं”