सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; मनसेकडून मोदींचं कौतुक

मुंबई | केंद्र सरकारने आपला दुसरा अर्थसंकल्प सादर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सकाळी 11 वाजता 2020-21 चा अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून स्वागत करण्यात आले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंबंधी ट्वीट केलं आहे.

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी ठेवींवरील विमा संरक्षण हे 1 लाखापासून वाढवून 5 लाख करावे व Income Tax कमी करून जसा मोठया Corporate House (उद्योगधंदे) ना दिलासा दिला, तसाच मध्यमवर्गीय ना दिलासा दयावा अशी जाहीर मागणीआम्ही केली होती, त्याची दखल घेत दोन्ही मागण्या प्राधान्याने जशाच्या तशा मान्य केल्याबद्दल अर्थमंत्र्याचे जाहीर आभार, असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

बँकेतील ठेवीदारांना व मध्यमवर्गीय Tax Payer ला या अर्थसंकल्पामुळे नक्कीच मोठा दिलासा मिळेल. सरकारचा हा स्तुत्य निर्णय आहे आणि ह्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो, असंही नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली आहे. तसेच भाजपसोबत जाण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेनं अर्थसंकल्पाबाबत केलेलं सकारात्मक भाष्य महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“तब्येत बिघडल्याने 2 पानं वाचायची राहिली… नाहीतर लोकांच्या डोळ्यात आणखी धुळफेक झाली असती”

-ते तिचं शरीर आहे… त्या शरीराबरोबर ती काहीही करु शकते; ट्रोलर्सना प्रियांकाच्या आईचं प्रत्युत्तर

-……म्हणून सुपर ओव्हरच्या ‘सुपर’ विजयानंतरही भारतीय संघाला मोठा दणका!

-मटन खाल्लं म्हणून हिणवणाऱ्या किरीट सोमय्यांना जितेंद्र आव्हाडांचं रोखठोक प्रत्युत्तर!

-अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोडला 17 वर्षांपूर्वीचा ‘तो’ विक्रम!