“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये”

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालीनी ठाकरे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. शालीनी यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

रेल्वे इंजिन भाड्याने द्या, म्हणून उपदेश देणार्‍यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेसह पक्षप्रमुख (uddhav Thackeray) उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनाला मोठा आणि जबर धक्का बसला आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुंबईसह राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’ काढत आहेत.

या यात्रेद्वारे आदित्य ठाकरे बंडखोरांच्या मतदार संघात शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावरूनच मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray ) यांनी टीका केली आहे.

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा हा तर एक बहाना आहे. पक्षात किती लोक उरले आहेत ते कदाचित तपासून पाहत आहेत आणि म्हणे मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही….. समय समय की बात है, असं म्हणत त्यांनी याआधीही मनसेवर टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीचा झटका; केली मोठी कारवाई 

‘महाराष्ट्रातही धर्मांतर विरोधी कायदा करा’; नितेश राणेंची सरकारकडे मागणी 

उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले… 

यंदाचे सर्व सण धुमधडाक्यात साजरे होणार, एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा 

‘शिवसेना फोडण्यामागे शरद पवार नाही, तर…’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य