मुंबई | शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मनसेवर बोचरी टीका केली होती. मी संपलेल्या पक्षावर बोलत नसतो’, असं म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेनंतर मनसेकडून पलटवार करण्यात आला आहे.
मनसेचे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी ट्विट करून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मातोश्रीत बसलेल्यांनी सभेला लाखोंची गर्दी जमवून दाखवावी, असा टोला लगावलाय.
शिवसेना संपली अशी ओरड काँग्रेसने अनेकदा केली, पण बाळासाहेबांनी शिवसेनेला अखेर उभं केलंच. त्यांच्याच परिश्रमाची सत्ताफळं आज मातोश्रीत बसून आदित्य ठाकरे खात आहेत, अशी बोचरी टीका त्यांनी केलीये.
मातोश्रीतल्या ठाकरेंनी लाखालाखांच्या जाहीर सभा घेऊन दाखवाव्यात. कोण संपलंय, हे त्यांना कळेल, असं म्हणत किर्तीकुमार शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही. तसेच मला स्टंटबाजीला भाव द्यायचा नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मनसेवर निशाणा साधला होता.
यापूर्वीही आदित्य ठाकरे यांनी मनसेला भाजपची ‘सी टीम’ म्हणून हिणवलं होतं. यामुळे आदित्य ठाकरे आणि मनसे यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सिनेसृष्टीला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम यांचं निधन
“वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत”
“माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे महाराष्ट्राचं नुकसान करतायेत”
महाराष्ट्राला हादरवलेल्या चंद्रपूरपमधील ‘त्या’ मुलीच्या हत्येमागचं धक्कादायक सत्य समोर!