Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

“21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?”, मनसेचा टोला

raj uddhav e1648913011688
Photo courtesy - facebook /MNS Adhikrut

मुंबई | शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदेंनी 35 समर्थक आमदारांसोबत बंड पुकारल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या समर्थक आमदारांसोबत सुरत येथील ले मेरेडियन हॉटेलमध्ये आहेत. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सुरत येथे जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली असून शिंदे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असून शिवसेनेच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीला केवळ 11 आमदार उपस्थित होते. या राजकीय घडामोडींवरून मनसेने शिवसेनेला टोला लगावला आहे.

21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे, याचा संदर्भ घेत मनसेचे संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटा दिवस, असा खोचक सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अहमदाबाद येथे एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करू शकतात.

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसच्या चर्चा रंगल्या आहेत. एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार

‘शिवसेनेच्या आमदारांना किडनॅप करून नेलं’, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

बंड मागे घेण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ठेवल्या ‘या’ अटी!

‘आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत’, एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट

“महाविकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही, कारण सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय”