मुंबई | सक्तवसूली संचनालयानं उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) मेव्हणे श्रीधर पाटणकरांच्या (Sridhar Patankar) मालमत्तेवर कारवाई केली आहे. तब्बल 6 कोटी 45 लाख रूपयांची संपत्ती जप्त केली आहे.
श्रीधर पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीतील संघर्ष आता आणखीनच वाढण्याची शक्यता दिसतेय.
ईडीच्या या कारवाईनंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत राजीनाम्याची मागणी केली आहे.
अशातच आता मनसे देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. मनसेने देखील उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीकास्त्र सोडलं आहे.
मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दुनियादारी चित्रपटातील फेमस डायलाॅगची एक क्लिप व्हायरल केली आहे. जितेंद्र जोशी यात मेहुणे, मेहुणे, मेहुण्यांचेsss पाहुणे, असा डायलाॅग मारतो. त्याची क्लिप शेअर करण्यात आली आहे.
दरम्यान, ईडीने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याने आता शिवसेना आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष नाराज असल्याचं पहायला मिळतंय. त्यावरून आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडीओ-
पाहुणे आले घरापर्यंत! pic.twitter.com/xgzydDxG1l
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 23, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
Mahua Moitra: “अटलजींची भीती आज खरी ठरली”, महुआ मोइत्रा लोकसभेत कडाडल्या
Deltacron: काळजी घ्या! महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संशयित रूग्ण सापडले
“भारतातल्या स्युडो सेक्यूलर जमातीने…”, The Kashmir Files वर बोलताना फडणवीसांची बोचरी टीका
Sharad Pawar: शरद पवार म्हणतात, “ऊसाचं बिल कर्ज काढून नव्हे, तर माल विकून द्या”
Nitin Gadkari: “60 किलोमीटर अंतरावर…”, नितीन गडकरींची लोकसभेत मोठी घोषणा