तुम्हाला मी खुपतो पण तुमचं पितळ एका दिवशी उघडं करणार; अविनाश जाधव आक्रमक

मुंबई | कोरोनाच्या काळात एका कंपनीने काम करणाऱ्या महिला कर्मचांऱ्यांना घरी पाठवलं होतं. दरम्यान याचा जाब विचारण्यासाठी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव गेले होते. मात्र त्यांनाच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली होता. आज त्यांना जामीन मिळाला असून ते बाहेर आले आहेत. बाहेर आल्यावर त्यांनी या प्रकरणात मला अडकवणाऱ्यांना सोडणार नसल्याचं जाधव यांनी सांगितलं.

मला कितीपण अडकवण्याचा प्रयत्न करा पण मी तुमचं पितळ उघडं करणार. असे कितीही गुन्हे तुम्ही दाखल करा मी काही भीत नाही. कारण विजय हा नेहमी सत्याचाच होतो, असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे. जाधव यांना जामीन मंजूर झाल्यावर कार्यकर्त्यांनी तळोजा कारागृहाबाहेर त्याचं स्वागत केलं.

मला तुम्ही अडकवण्याचा जो काही प्रयत्न केला तो महाराष्ट्राने पाहिला. मला संपवायचं असेल तर संपवा मात्र त्या मुलींचं काय?, त्यांचं कुटूंब उद्ध्वस्त होऊ देऊ नका, तुम्हाला मी खुपसतो कारण मी जे सत्य असेल ते समोर आणतो, असं जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जाधव यांना अटक झाली तेव्हा मनसेने आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरत जोरदार टीका केली होती.

महत्वाच्या बातम्या-

चांगली बातमी! अवघ्या ‘इतक्या’ रूपयात कोरोनाची लस होणार उपलब्ध

एअर इंडियाच्या विमानाला केरळमध्ये भीषण अपघात; विमानाचे झाले दोन तुकड

सुशांत सिंहची हत्या झाली असेल तर मग…; रोहित पवारांनी भाजपला सुनावलं

खासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला बसणार चाप; राज्य सरकारकडून भरारी पथकं तैनात!

“भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे”