मनसे विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा लढवणार???

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये ‘लाव रे तो’ व्हीडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंच्या मनामध्ये विधानसभा निवडणूक लढवावी की लढू नये, असा संभ्रम सुरू असताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राज ठाकरे निवडणुकीत काही उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक लढू नये, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं होतं. मात्र काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर राज ठाकरे यांचं मत बदलल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतरच राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती आहे.

मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास मनसे 50 ते 60 जागांवर निवडणूक लढणार असल्याचेही समजतय. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, पंढरपूर, वणी तसेच काही ग्रामीण भागामध्ये जिथे मनसेची ताकद आहे, अशा ठिकाणी मनसे आपले उमेदवार देऊ शकते.

माहीम मतदारसंघामध्ये मनसेकडून संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि नितीन सरदेसाई हे तीन जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

दरम्यान, मनसेने काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत विधानसभा निवडणुकीत यावं, अशी काही काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा होती तर काहींचा विरोध होता. जर काँग्रेस सोबत गेलो तर मनसेला पडणारी मतं देखील पडणार नाही, असं मत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं असल्याचं कळतंय.

महत्वाच्या बातम्या-