मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठीसाठी मनसे आणि आघाडीची छुपी हातमिळवणी झाल्याची माहिती कळतीये. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळं राज ठाकरे निवडणूक लढवण्यास राजी झाले असून मनसे राज्यात किमान 100 जागा लढवणार असल्याची माहिती आहे.
युतीच्या मतांच्या ध्रुवीकरणासाठी मनसेचा वापर करून मोबदल्यात आघाडी मनसेला 25 जागांवर मदत करणार असल्याची देखील माहिती कळतीये.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबादसह काही मोजक्या शहरांमध्ये जवळपास 100 जागा लढण्याचा निर्णय झाल्याचं समजतंय.
निवडणुका लढवण्यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्याबाबतचा निर्णय राज ठाकरेच घेतील. ईव्हीएमबद्दल आमची शंका आहेच, असं बाळा नांदगावकर यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
दरम्यान, विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर व्हायला फक्त काही तास दिवस बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
जर विधानसभा लढायचं ठरलं तर स्वबळावर लढू- बाळा नांदगावकर https://t.co/r1pJ6T2Oso @BalaNandgaonkar @mnsadhikrut
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019
कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करण्याच्या निर्णयावर राहुल गांधीची टीका – https://t.co/skwCfDk303 @RahulGandhi @nsitharaman @INCMaharashtra @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादी साधू-संत नाही- राजू शेट्टी https://t.co/34Z3g6yJcO @rajushetti @INCMaharashtra @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019