न्यूड फोटो शेअर करणाऱ्या मिलिंद सोमणला चाहत्यांनी ‘या’ कारणाने डोक्यावर घेतलं!

मुंबई|  अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणानं चर्चेत असतो. केव्हा तो सोशल मीडियावर आपले न्यूड फोटोज शेअर करतो तर केव्हा समाजाला एक वेगळा संदेश देत असतो.

अलीकडेच त्याने सोशल मीडियावर आपला एक वादग्रस्त फोटो शेअर केल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. आता मिलिंद पुन्हा एकदा नव्या फोटोमुळे चर्चेत आला आहे.

या फोटोत तो कचरा उचलताना दिसत आहे. मंदिरात जातानाच्या वाटेला मिळालेला कचरा मिलिंद उचलत आहे. पत्नी अंकिता कोंवर आणि आई उषा सोमण यांच्यासोबत मिलिंद शिव मंदिरात गेला होता.

तेव्हा मिलिंद याने वाटेवर असणारा प्लॅस्टिकचा कचरा उचलला. त्याच्यासोबत एक फोटोही काढला आणि आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअरही केला. मिलिंद सोमण याने शेअर केलेल्या पहिल्या फोटोत त्याच्या दोन्ही हातात कचरा आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये शंकराच्या मंदिरातला फोटो आहे.

मिलिंदने फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, आज अंकिता आणि आईसोबत शिव मंदिराच्या छोट्या ट्रेकवर गेलो. चालणं जास्त रंजक करण्यासाठी आणि देवाचा सन्मान करण्यासाठी मी वाटेवरचा जेवढा कचरा उचलता येणं शक्य आहे तेवढा उचलला.

तेथील चौकीदाराने सांगितलं की कचरा कुंडीत कचरा टाकला तर माकडं येऊन तो कचरा बाहेर फेकतात म्हणून तिथे कचराकुंडी ठेवण्यात आली नाही, असंही मिलिंद सोमण याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

तसेच मिलिंदने पुढे लिहिले की, मुद्दा क्रमांक एक- मला खरोखर वाटतं की आता ती वेळ आली आहे. जेव्हा आपण माकडांपेक्षा थोडं हुशार होऊया. मुद्दा क्रमांक दोन- खाद्य कंपन्यांनी प्रत्यक्षात बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग करणं सुरू केलं पाहिजे जेणेकरून लोक जंकफ्री फूड खावू शकतील.

मिलिंद सोमणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी त्याची ही पोस्ट लाइक केली आहे. यासोबतच प्रतिक्रिया देत आपली मतंही मांडली आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मिलिंद सोमण याने एक न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत मिलिंद सोमण समुद्रकिनारी न्यूड धाव घेत होता. यामुळे त्याच्यावर गु.न्हा देखील दाखल झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

खुशखबर! तरुणाईची लाडकी ‘पब्जी’ आता भारतात पुन्हा येणार?

शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येणार? बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या…

भाजपला मोठा धक्का! भाजपला मी धडा शिकवणार म्हणत ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी

मोठी बातमी! खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतरचा पवारांचा पहिलाच खानदेश दौरा ‘या’ कारणामुळे रद्द

‘…म्हणून राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतलं आहे’; प्रसाद लाड यांचा मोठा गौप्यस्फोट!