नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प येणार साथ साथ, 50 हजारहून अधिक लोकांना करणार संबोधित

वॉशिंग्टन : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. मोदी टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

 मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या कार्यक्रमात 50 हजारहून अधिक लोकांना संबोधित करणार आहेत. मेडिसन स्केवर आणि सिलिकॉन व्हॉली येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा तिसरा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. 

कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सहभागी होणर असून ‘हाऊडी मोदी’ हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार आहे.

‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमामुळे भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होणार असल्याचं समजतंय. ह्युुस्टनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंध, व्यापार, संस्कृती यावर चर्चा होणार आहे.

दरम्यान, अमेरिकेमध्ये पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. तसेच त्यात भारतीय मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं समजतंय.

महत्त्वाच्या बातम्या –