नवी दिल्ली : भाजप-शिवसेना यांच्यातला जागावाटपाचा वाद अजून संपला नाहीये. जागावाटपाबाबत आजपासून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु होणार आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना कोणत्या अटींवर युती करायची याबाबत सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेसोबत युती करा पण तडजोड करु नका, अशी सूचना मोदींनी केद्रींय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांना दिल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
भाजपकडून जास्त जागांची मागणी केली जाऊ शकते त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसत आहे.
त्यामुळे आजच्या बैठकीत काय चर्चा होणार हे पाहण गरजेचं आहे.
शिवसेना -भाजपमध्ये येत्या पाच दिवसात जागावाटपाची चर्चा पूर्ण होणार आहे. भाजपतर्फे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेतर्फे सुभाष देसाई यांच्यासह इतर नेते चर्चा करणार असल्याची माहिती कळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
छगन भुजबळांना शिवसेनेत येऊ देणार नाही; संजय राऊतांची भूमिका – https://t.co/auIhrMA3oh @rautsanjay61 @ChhaganCBhujbal @NCPspeaks @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019
लबाड राष्ट्रवादीनं शब्द देऊन फसवलं; हर्षवर्धन पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल – https://t.co/jymmhSFQD6 @Harshvardhanji @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019
विंग कमांडर अभिनंदन यांना दिलेल्या त्रासाचा भारतीय लष्कराने ‘असा’ घेतला बदला – https://t.co/WUmT863xh2 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 4, 2019