देश

मोदी सरकार देतंय ४२ लाख रुपये जिंकण्याची संधी, कुणीही करु शकतं अर्ज

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यावर कधी जमा करणार?, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. भाजपाध्यक्ष अमित शहांनी हा चुनावी जुमला असल्याचं जाहीर केल्यानंतर आता कुणाच्याही खात्यात अशा प्रकारचे पैसे जमा होणार नाहीत हे स्पष्ट झालं. राजकारणात चिखलफेक होत असते त्यामुळे हा मुद्दा धुरळ्यासारखा नेहमी उठत राहतो. आता लोकही या मुद्द्याला विनोदी अंगानं घेतात आणि सोडून देतात. मोदी सरकार प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करणार नाही हे तर स्पष्ट आहेच, मात्र त्यांनी जनतेला आता ४२ लाख रुपये जिंकण्याची संधी मात्र उपलब्ध करुन दिली आहे.

नेमकी काय आहे ही संधी?-

मोदी सरकार ४२ लाख रुपये देणार म्हटल्यावर अनेकांना ही थट्टा वाटली असणार. बातमी पूर्ण न वाचता दोन-चार जणांनी कमेंटही केल्या असतील. मात्र ही थट्टा नाही तर हे खरं आहे. मोदी सरकार खरंच ४२ लाख रुपये जिंकण्याची संधी देत आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस योजनेंतर्गत भारतीय जनतेला ही संधी देण्यात आली आहे. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, सरकारला कल्पक आयडिया द्यायच्या आहेत. सरकारी योजना योग्य पद्धतीने राबवण्यासाठी या कल्पनांचा वापर व्हायला हवा. खोटं वाटत असेल तर स्टार्टअप इंडियाचं ट्विटर हँडल तुम्ही चेक करु शकता. यावर यासंदर्भातच एक ट्विट करण्यात आलं आहे. 

नेमके कुणाला आणि कसे मिळणार पैसे?

सरकारने सात क्षेत्रातील लोकांकडून यासंदर्भात सूचना मागवल्या आहेत. लाइसेंस एंड परमिट, एक्सपोर्ट एंड लाजिस्टिक, प्रॉपर्टी इंफार्मेशन सिस्टम आणि टैक्स फाइलिंग या क्षेत्रांचा त्यामध्ये समावेश आहे. तुम्हाला या क्षेत्रांशी संबंधित काही कल्पना असतील त्या तुम्ही सरकारसोबत शेअर करु शकता. या सूचना या क्षेत्रांसाठी लाभदायक असल्या पाहिजेत. ज्या राबवल्यामुळे या क्षेत्रांना फायदा व्हायला हवा. अशा सूचनांचं सरकार स्वागत करेल. यापैकी काही खास सूचना निवडल्या जातील आणि त्यांचा सन्मान केला जाईल. 

नक्की कुणाला मिळणार ४२ लाख रुपये-

४२ लाख रुपये कुणा एका व्यक्तीला मिळणार नाहीत, तर कल्पक कल्पना देणाऱ्यांना ४२ लाख रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश आहे. सरकारने जी सात क्षेत्रं निवडली आहेत, त्या प्रत्येक क्षेत्रातून ३ विजेते काढण्यात येणार आहेत, ज्यांच्या कल्पना सर्वात भन्नाट असतील. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला ३ लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला २ लाख रुपये तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला १ लाख रुपये मिळणार आहेत. सात क्षेत्रातील प्रत्येकी तीन विजेत्यांना असं ४२ लाख रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे. १ फेब्रुवारी २०१९ रोजी या विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. 

कुठं भेटू शकते अधिक माहिती?

स्टार्टअप इंडियाच्या ट्विटर हँडलवर यासंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. अधिक माहिती हवी असेल तर ती स्टार्टअप इंडियाच्या वेबसाईटवर मिळू शकते. www.startupindia.gov.in ही त्यासंदर्भातील अर्ज करण्याची वेबसाईट आहे. १ जानेवारी २०१९ पर्यंत तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येऊ शकतात. तुमच्याकडे काही कल्पना असतील ज्या सरकारी कामांना अधिक सुखकर बनवू शकतील तर त्या तुम्ही सरकारसोबत नक्की शेअर करा, तुम्हालाही लखपती होण्याची संधी मिळू शकते.

IMPIMP