देश

मोदी सरकार नितीश कुमार यांनाही डोक्यावर सोडणार?

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती तोडल्यानंतर आता मोदी सरकार बिहारमध्ये नितीश कुमार सरकारचाही पाठिंबा काढून घेण्याची शक्यता आहे. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांनी यासंदर्भात खुलासा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता भाजपला पीडीपीसोबत युती परवडणारी नव्हती. त्यामुळे पीडीपीचा पाठिंबा काढून भाजपनं मुफ्ती सरकार पाडलं. आता राज्यपाल राजवट लागू झाल्यानं राज्य एकप्रकारे केंद्रात सत्ता असलेल्या भाजपच्याच हातात आहे. 

काश्मीरमध्ये पीडीपीसोबत भाजपनं जो व्यवहार केला, तोच व्यवहार नितीश कुमार यांच्यासोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही पक्षांमध्ये सारं काही नक्कीच आलबेल नाही. 2017 साली झालेल्या या युतीत सदा सर्वकाळ कुरबुरी सुरु आहेत. 

नितीश कुमार सातत्याने बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेऊन ते ही मागणी रेटत असले तरी मोदींसाठी ही मागणी डोकेदुखी ठरत असल्याचं कळतंय. नीती आयोगाच्या बैठकीतच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आपली मागणी रेटल्यामुळे या युतीतील बेबनाव समोर आलाय. 

दरम्यान, बिहारमधील लोकसभेच्या जागा वाटपावरुनही दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. 40 पैकी 25 जागा नितीश कुमारांना हव्या आहेत, भाजपसह इतर घटक पक्षांनी मिळून उरलेल्या 15 जागा लढवाव्यात यासाठी नितीश कुमार आग्रही असल्याचं कळतंय, त्यामुळे हा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे. 

IMPIMP