Top news कोरोना देश राजकारण

कोरोना लशीबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा! पहा कोणाला मिळणार विनामूल्य लस?

नवी दिल्ली | गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. कोरोना महामारीमुळे लोकांचं आयुष्य जणू एकाच जागी थांबलं आहे. या महामारीवर लस केव्हा येणार? या एका गोष्टीकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. कोरोना लसीवर जगातील कित्येक शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.

जगातील काही देशांनी नागरिकांना कोरोना लस मोफत देण्याची घोषणा देखील केली आहे. मोदी सरकारने देखील आज कोरोना लसीवर महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारकडून सर्वांचंच लशीकरण मोफत होणार नसल्याचं केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

फक्त प्राथमिक गटातील लोकांना आणि ज्यांची प्रकृती गंभीर आहे किंवा ज्यांची कोरोना रुग्ण म्हणून नोंद आहे, अशाच लोकांना लस मोफत देण्यात येणार असल्याचं केंद्रानं स्पष्ट केल्याची माहिती मिळाली आहे.

मात्र, इतर देशाच्या तुलनेत भरतातील कोरोना लस स्वस्त असेल, असं देखील आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कोरोना लशीचे वितरण आणि किंमत याबाबत महत्वपूर्ण बैठक घेतली आहे.

तज्ञांकडून कोरोना लशीला मंजुरी मिळताच कोरोना लशीकरण कार्यक्रम सुरु केला जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. तसेच कोरोना लशीची किंमत किती असेल याबाबत राज्यांशी विचारविनिमय करून किंमत ठरवली जाईल, असं देखील मोदींनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ब्रिटन या देशाने व्यापक वापरासाठी बनवलेल्या ‘फायझर-बायोएनटेक’च्या कोरोना व्हायरसवरील लसीला मंजुरी दिली आहे. कोरोना व्हायरसवरील लस मंजूर करणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश बनला आहे.

पुढील आठवड्यात ब्रिटन मधील लोकांना ही लस देण्यात येणार आहे. अमेरिकी फार्मा कंपनी ‘फायझर’ आणि जर्मन कंपनी ‘बायोएनटेक’ या कंपन्यांनी एकत्र मिळून ही लस बनवली आहे.

या लसीविषयी माहिती देताना ब्रिटन सरकारने म्हटले आहे की, स्वतंत्र औषध आणि आरोग्य सेवा नियामक एजन्सीची शिफारस स्वीकार करत सरकारने फायझर-बायोएनटेक च्या कोव्हिड-19 व्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे. संपूर्ण युकेमध्ये पुढील आठवड्यापासून ही लस उपलब्ध होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ भाजप नेत्याने आता तर हद्दच पार केली! ममता बॅनर्जींना शिवी देत म्हणाले…

शेतकऱ्यांपुढे मोदी सरकार नमलं; आंदोलकांना दिली ‘ही’ परवानगी!

गाडी घ्यायचा विचार करताय?; भारताच्या ‘या’ सर्वात सुरक्षित गाड्या नक्की पाहा!

कंगनाचं ट्वीटर अकाउंट निलंबित होणार? मुंबई हायकोर्टात याचिका दाखल

‘या’ दोन रक्तगटाच्या लोकांना कोरोनाचा सर्वात कमी धोका!