मोठी बातमी! मोदी सरकारच्या ‘या’ एका निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ

नवी दिल्ली | भारत दिवसेंदिवस अन्नधान्य निर्यातीत अग्रेसर देश बनत चालला आहे. तरीही देशातील शेतकरी आपल्या मालाला भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत.

गहू, तांदूळ अशा खाद्य पिकांची आपला देश निर्यात करतो. अशातच केंद्र सरकारनं अचानकपणे गव्हू निर्यात करण्यावर बंदी घालण्याची घोषणा केलीयं.

गव्हू निर्यात बंदी केल्यानं सर्वत्र सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. जागतिक स्तरावर गव्हाचा तुटवडा निर्माण होत आहे. परिणामी मोदींच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर जोरदार वाढत आहेत. शिकागोमध्ये 1 बुलश म्हणजेच 27.216 किलो गव्हासाठी तब्बल  12.47 डाॅलर मोजावे लागत आहेत.

मोदी सरकारच्या या निर्णयानं आंतरराष्ट्रीय बाजारात दिवसेंदिवस गव्हाचे दर वाढतच आहेत. सध्या सहा टक्के वाढ नोंदवली गेली आहे. परिणामी इतर देश निर्यात बंदी उठवण्याची मागणी करत आहेत.

भारताचा गव्हू उत्पादनात चिननंतर दुसरा क्रमांक लागतो. अशात युक्रेन-रशिया युद्धामुळं आणि युक्रेनमधील खराब वातावरणामुळं भारतीय गव्हाला मागणी वाढली आहे.

दरम्यान, सध्या भारतात महागाईनं उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ वर्षातील सर्वाधिक स्तरावर महागाई गेली आहे. अशात निर्यात बंदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंनी संघावर टीका केल्याने ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

 “…तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू”

 “स्वत:च्या बायकोला लोक बोलली तर इतरांना पुढं करता का?”

 “कारवाई न झाल्यास जशास तसं उत्तर देऊ”; देवेंद्र फडणवीस आक्रमक

“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही”