Petrol-Diesel च्या वाढत्या किंमतीवर केंद्र सरकारचा संसदेत दावा, म्हणाले…

नवी दिल्ली | सध्या देशात मोठ्या वेगानं महागाई नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) दरामध्ये गेल्या काही दिवसात विक्रमी वाढ झाली आहे.

गेल्या आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये 10 रूपयांची वाढ झाली आहे. परिणामी मोदी सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागतोय.

विरोधकांनी सरकारला महागाई कमी करण्यासाठी संसदेत घेरायला सुरूवात केली आहे. यावर सरकारकडून देखील आता उत्तर आलंय. पण समाधानकारक तोडगा निघेल ही अपेक्षा चुकीची ठरली आहे.

देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना इतर देशांतील वाढत्या इंधन दरांचा दाखला दिला आहे. परिणामी विरोधकांनी गोंंधळ घातला.

इतर देशांच्या तुलनेत भारतात खूप कमी प्रमाणात इंधनाचे दर वाढत असल्याचं हरदिपसिंग पुरी म्हणाले आहेत. इतर देशांच्या तुलनेत 1/10 या प्रमाणात किंमती वाढल्या आहेत.

जर आपण मार्च 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान तेलाच्या किंमतीत इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी प्रमाणात वाढ झाली आहे.  अमेरिकेत 51 टक्के, फ्रान्समध्ये 50 टक्के वाढ झाली आहे.

कॅनडामध्ये 52 टक्के, ब्रिटनमध्ये 55 टक्के, स्पेनमध्ये 58 टक्के वाढ झाली पण भारतात केवळ 5 टक्के किंमत वाढली, असं हरदिपसिंग पुरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वाढत्या महागाईवरून भाजप सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. महागाईवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक जोरदार घोषणाबाजी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर; पहिल्याच दिवशी मिळवा ‘इतक्या’ हजारांचा बंपर डिस्काऊंट

 Sanjay Raut: “आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो”; संजय राऊत कडाडले

 ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

  “पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”

  लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आली समोर, रेल्वेनं घेतला मोठा निर्णय