देश

मोदी सरकार प्रत्येकाच्या बँक खात्यात महिन्याला 2500 रुपये जमा करणार?

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यावर कधी जमा करणार?, असा प्रश्न नेहमी विचारला जातो. भाजपाध्यक्ष अमित शहांनी हा चुनावी जुमला असल्याचं जाहीर केल्यानंतर आता कुणाच्याही खात्यात अशा प्रकारचे पैसे जमा होणार नाहीत हे स्पष्ट झालं. मात्र याच चुनावी जुमल्याचा तोटा भाजपला पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत झाला. या पाच राज्यात भाजपला सपाटून मार खावा लागला. आता भाजप पक्षाला खडबडून जाग आली आहे. त्यामुळेच की काय प्रत्येक भारतीयांच्या खात्यात महिन्याला 2500 रुपये टाकण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याचं कळतंय. लवकरच या योजनेची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. 

काय आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम योजना ??

युबीआय (युनिव्हर्सल बेसिक इन्कम) योजनेच्या अंतर्गत प्रत्येक भारतीयाच्या खात्यात 2500 रूपये जमा होतील, अशी माहिती मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी दिली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाचं मासिक उत्पन्न मजबूत व्हावं यासाठी ही योजना आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.  15 जानेवारीनंतर देशात ही योजना लागू होऊ शकते, अशी माहिती आहे. 

मोदी सरकारला कोणी दिलाय हा सल्ला ??

लंडन विद्यापिठाचे प्राध्यापक गाय स्टॅंडींग यांनी मोदी सरकारला हा सल्ला दिला आहे. यूबीआय योजनेत गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता एक समान रक्कम दर महिन्याला प्रत्येक भारतीयाला मिळाली, तर आणि तरच ही योजना यशस्वी होऊ शकते. मात्र या योजनेत भ्रष्टाचार होण्याची अधिक शक्यता आहे, असा इशाराही प्राध्यापक गाय स्टँडिंग यांनी दिला आहे. 

यूबीआयची कार्यपद्धती कशी असणार आहे ??

-प्रत्येक नागरिकाच्या मोबाईल नंबरला सरकार आधार नंबरने जोडणार आहे.

-आधार नंबरने जोडलेल्या व्यक्तीच्या खात्यात दर महिन्याला 2500 रूपये सरकार टाकणार आहे.

मोदी सरकार ही घोषणा का करत आहे ??

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांत सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपला आपली सत्ता गमवावी लागली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार विराजमान झालं आहे. जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याप्रमाणे काँग्रेसने सत्तेवर येताच काही तासांच्या आत शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. आगामी लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसनं शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानं भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचं पहायला मिळालं. आपला जनाधार कमी होऊ नये यासाठी मोदी सरकारला त्यामुळे नवं पाऊल उचलणं गरजेचं वाटलं असावं. त्यामुळेच मोदी सरकारने युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही योजना आणली असण्याची शक्यता आहे.

यूबीआय योजना लागू करून मोदी सरकार भारतीय जनतेची सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. ही योजना लागू झाली तर भाजपला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा होईल. या योजनेने खरंच देशातील गरिबी दूर होईल? यावर आता चर्चा रंगू शकते. 

IMPIMP