मोदी सरकार आता तुमच्या मुलींच्या लग्नाचं वय ठरवणार???

नवी दिल्ली |  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच सीतारामन यांनी मुलींच्या लग्नाच्या वयात बदल करण्याचे संकेत दिले आहेत.

मुलींच्या पोषणाच्या दृष्टीकोनातून त्यांच्या लग्नाचे वय बदलण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी एका कृती दलाची स्थापन करण्यात येणार असून त्यांच्याकडून याबद्दल आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारकडून लवकरच मुलीच्या लग्नाचं वय वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

सध्या मुलींच्या लग्नाचं वय 18 वर्षे आहे. मुलींच्या शारीरिक पोषणाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात एका कृती दलाची स्थापना करण्यात येणार असून त्यांच्याकडून याबद्दल पुनर्विचार करण्यात येईल, असं निर्माला सीतारमन यांनी म्हटलं आहे.

पोषणाशी संबंधित योजनांवर ३५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचं सीतारामन यांनी जाहीर केलं. तसेच शाळेत जाणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-केंद्र सरकारची पुन्हा राजधानीकरांना सावत्रपणाची वागणूक; अर्थसंकल्पावर केजरीवाल भडकले

-येत्या संपूर्ण दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प- देवेंद्र फडणवीस

-महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीसाठी संशोधन केंद्र उभारणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

-आदिवासींच्या गरीबीची चेष्टा करू नका; किरीट सोमय्यांना आव्हाडांनी दिलं सडेतोड उत्तर

-सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प; मनसेकडून मोदी सरकारचं कौतुक