मुंबई | कोरोनानं गेल्या दीड वर्षांपासून जगभर थैमान घातलं आहे. 2020च्या सुरूवातीपासून कोरोनानं जगभर आपली दहशत माजवली त्यानंतर परिस्थिती इतकी गंभीर बनायला लागली की सर्वत्र कठोर निर्बंध लादण्यात आले.
कोरोना काळात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लाॅकडाऊनची घोषणा केली होती. अचानक केलेल्या घोषणेनंतर परिस्थिती चिघळायला लागली होती. कित्येक ठिकाणी मोठी समस्या उभी राहिल्याचं देशानं पाहिलं आहे.
देशाला कोरानाच्या पहिल्या लाटेपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं लाॅकडाऊन लागू केला होता. याचा सर्वाधिक फटका हा स्थलांतरीत मजूरांना झाला होता. देशातील विविध भागातून महाराष्ट्रात रोजगारासाठी मजूर येतात. आता यावरून राजकारण पेटलं आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत देशभर लाॅकडाऊनचं पालनं केलं जात असताना महाराष्ट्रात मात्र वेगळी परिस्थिती होती, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचेननंतरही महाराष्ट्रातून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मजूरांना रेल्वेद्वारे पाठवण्याची व्यवस्था काॅंग्रेसनं केल्याची टीका मोदींनी संसदेत केली आहे. अर्थसंकल्पावर चर्चा करताना मोदींनी संसंदेत काॅंग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
काॅंग्रेसनं मुंबईच्या रेल्वे स्थानकावर उभं राहून लोकांना मुंबई सोडून जाण्यासाठी प्रोत्साहित केलं. कामगार, मजूरांना प्रेरित करण्यात आलं. लोकांना मोफत तिकीटं देण्यात आली, अशी खरमरीत टीका मोदींनी काॅंग्रेसवर केली आहे.
महाराष्ट्रात आमच्यावर जो बोजा आहे तो कमी करण्यासाठी काॅंग्रेसनं हे केलं. तुम्ही बिहारचे आहात, तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात, तुम्ही जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जाऊन कोरोना पसरवा. तुम्ही हे मोठं पाप केल्याची टीका मोदींनी काॅंग्रेसवर केली आहे.
मुंबईतील कामगारांना फसवण्याचं काम केलं. अफरातफरीचं वातावरण निर्माण केलं, कामगार बांधवांना अनेक ठिकाणी प्रसंगात ढकलून दिलं, अशी घणाघाती टीका मोदींनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
संसदेत नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल, म्हणाले “टुकडे टुकडे गँगची लीडर…”
भाजप खासदाराला आला मुलीचा ‘न्यूड व्हिडीओ काॅल’ अन्…
निळी साडी अन् लाल ब्लाऊज… राजेश्वरी खरातचा ‘हा’ हॅाट डान्स तुफान व्हायरल!
“तुमची हिम्मत कशी झाली?”; लतादीदींसाठी बाळासाहेबांनी थेट गुलशन कुमारांना झापलं
ओमिक्राॅनमुळे ‘या’ लोकांचा होतोय मृत्यू, ICMRच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर