नवी दिल्ली | स्वातंत्र्याच्या इतिहासात काॅंग्रेस पक्षानंतर केंद्रात बहुमतानं सरकार कोणी आणलं असेल तर ते देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांनी आणलं. पण मोदींच्या अनभिषिक्त साम्राज्याला शेतकऱ्यांनी (Farmers Protest) हादरवून टाकलं आहे.
स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ रस्त्यांवर चाललेलं आंदोलन म्हणून शेतकरी आंदोलनाला ओळखण्यात येत आहे. आता देशातून एनआरसी आणि सीएए हे कायदे रद्द कारण्याची मागणी होवू लागली आहे.
शेतकरी आंदोलनानंच नरेंद्र मोदी सरकारला प्रचंड बहुमत असतानाही संसदेत केलेला कृषी कायदा मागं घ्यावा लागला आहे. परिणामी कृषी कायदे मागं घेणं म्हणजे मोदी सरकारच्या आत्मविश्वाला तडा मानला जात आहे.
प्रचंड बहुमताच्या जोरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले यातील काही निर्णयांचं स्तरातून स्वागत करण्यात आलं तर काही निर्णांयांना विरोध झाला आहे.
जम्मू काश्मीरमधील 370 रद्द करण्याचा निर्णय, देशात एनआरसी-सीएए लागू करण्याचा निर्णय, खासगीकरणाचा निर्णय, हे काही महत्त्वाचे निर्णय आहेत.
केंद्रीय तीन कृषी कायद्यांच्या विरोधात मोदी सरकारला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला होता. संसदेच्या घेरावापासून ते सीमांवर ठिय्या मांडून बसण्यापर्यंत शेतकरी कसल्याही कारवाईला घाबरत नव्हते.
शेतकरी आंदोलनाअगोदर एक आंदोलन दिल्लीच्या शाहिनबाग येथे सीएए आणि एनआरसीविरोधात (CAA-NRC Protest) झालं होतं पण कोरोनाच्या प्रादुर्भावानं हे आंदोलन संपुष्टात आलं. ज्याप्रमाणं शेतकऱ्यांनी संघर्ष केला अगदी तसाच संघर्ष करायला मुस्लीम समाजानं तयार राहावं लागेल, असं जमियत उलेमा ए हिंद प्रमुख अर्शद मदानी यांनी म्हटलं आहे.
कृषी कायदे रद्द केल्यानंतर आता पुन्हा देशातून एनआरसी आणि सीएए हे कायदे सुद्धा रद्द करण्याची मागणी होत आहे. देशातील प्रमुख मुस्लीम संघटना जमियत उलेमा ए हिंद प्रमुख मौलाना अर्शद मदानी यांनी पंतप्रधान मोदींकडे सीएए आणि एनआरसी कायदा मागे घेण्याची मागणी केलीय.
नागरिकत्व सुधारणा कायदा हा देशातील मुस्लीमांना त्रासदायक आहे. या काद्याचे प्रचंड मोठे दुष्परिणाम देशातील मुस्लीम समाजावर होणार आहेत, असं वक्तव्य मदानी यांनी केलं आहे. त्यामुळे आता दिल्लीत सीएए आणि एनआरसी आंदोलन पुन्हा उभं राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्रातील भाजप सरकारनं केंद्रीय कृषी कायदे मागं घेतल्यानं नरेंद्र मोदी यांच्या साम्राज्याला सुरूंग लागल्याची चर्चा विरोधक करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“संजय राऊत निम्मे डॉक्टर, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो”
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ
“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला”
घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा