क्रिकेटपटू मोहम्मद शमीला न्यायालयाकडून मोठा दिलासा…

नवी दिल्ली : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीला जिल्हा न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी शमीच्या नावानं अटक वॉरंट निघालं होतं. परंतू त्यावर स्थगिती मिळवण्यात शमीच्या वकिलांना यश मिळालं आहे. कोलकत्ता जिल्हा न्यायालयाने सोमवारी शमीच्या अटक वॅारंटला स्थगिती दिली आहे. 

कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी शमीची पत्नी हसीन जहाँने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळेस शमी वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर होता. 

शमीच्या पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्या अडचणीत वाढ होणार होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्याला न्यायालयाने दिलासा दिला आहे.

शमीला 15 दिवसांच्या आत सरेंडर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरही शमी भारतात परतला नाही, तो अमेरिका दौऱ्यावर गेला.

दरम्यान, शमी अमेरिकेहून 17 सप्टेंबरला येणार होता. परंतू आता शमीच्या वकीलांनी त्याच्या अटक वाॅरंटवर स्थगिती मिळवली आहे.

महत्वाच्या बातम्या-