नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त शमीने ट्विटरवर एक भावनिक ट्विट केलं आहे.
माय लिटल स्वीटहार्ट, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझी मला खूप आठवण येत आहे. काळजी करु नकोस मी कायम तुझ्यासोबत आहे आणि लवकरच तुला भेटायला येणार आहे, असं शमीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कौटुंबिक वादामुळे शमी सध्या आपल्या मुलीपासून दूर राहात आहे. त्यामुळे त्याने सोशल मीडियावर तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने मागील वर्षी मार्च महिन्यात शमीवर गंभीर आरोप केले होते. बाहेर त्याचे इतर मुलींसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप तीनं केला होता.
हसीन जहाँने शमीवर कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, हत्येचा प्रयत्न तसेच मॅच फिक्सिंगसारखे आरोप लावले होते. सोशल मीडियावर तीने यासंदर्भात पोस्ट केल्या होत्या.
मोहम्मद शमीने आपल्या पत्नीचे आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणी आता कायदेशीर लढाई सुरु आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यामुळे शमी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता त्याने ट्विटरवर मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेलं ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे.
वाचा मोहम्मद शमीनं केलेलं ट्विट-
Many many happy returns of the day my little sweetheart ????????????????????????missing you so much baby I’m with you always don’t worry I’m coming to meet you soon ????????????#birthday pic.twitter.com/9VQuNXTcV7
— Mohammad Shami (@MdShami11) July 17, 2019
महत्वाच्या बातम्या-