“राहुल, सोनिया गांधी स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि कॅमेरासमोर येऊन रडतात”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी शत्रूंची सोबत करतात. स्वत:च्या स्वार्थासाठी ते आणि सोनिया गांधी कॅमेरासमोर येऊन रडतात, असा घणाघात मुस्लीम धर्मगुरु इमाम मोहम्मद तौवहिदी यांनी केला आहे. भारताने कलम 370 रद्द करण्याच्या प्रकरणाबद्दल तौवहिदी यांनी काही ट्विट केले आहेत. त्यापैकी एका ट्विटमध्ये त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ऑस्ट्रेलियात वास्तव्यास असणाऱ्या तौवहिदी यांनी भारताचे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. कायमच काश्मीर हा भारताचा भाग असल्याची भूमिका घेणाऱ्या तौवहिदी यांनी कलम ३७० संदर्भातील निर्णयाला विरोध करणाऱ्यांवर टिका केली आहे. 

त्यांनी भारतात सत्तेवर असणाऱ्या भाजपचा प्रमुख विरोधी असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या राहुल गांधी तसेच सोनिया गांधी यांच्यावर तोवहिदी यांनी शेलक्या शब्दात टिका केली आहे.

राहुल गांधी हे अत्यंत वाईट राजकारणी आहेत. मोदींना विरोध करण्यासाठी ते शत्रूंची सोबत करतात. सोनिया गांधीही तशाच आहेत. गाझामधील कट्टरतावाद्यांशी असलेले त्यांचे संबंध विसरता येणार नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि नंतर कॅमेरासमोर येऊन रडतात. हे मुरब्बी राजकारणी नाहीत, असं तौवहिदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-पश्चिम महाराष्ट्र पूरात असताना मुख्यमंत्री ‘महाजनादेश’ यात्रेत मग्न- प्रकाश आंबेडकर

-धैर्यशील माने यांची पूरग्रस्तांना मदत; उचलली पाठीवर पोती

-ऑलिम्पिक पात्र खेळाडूंना 50 लाखांचं अर्थसहाय्य- आशिष शेलार

-सावत्र वडिलांनी केलेल्या छळानंतर श्वेता तिवारीची मुलगी म्हणते…

-“मी विमान पाठवतो, तुम्ही स्वत: या आणि काश्मीरमधील परिस्थिती बघा”