देशात दोनच मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणणं गरजेचं- मोहन भागवत

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर लोकसंख्या नियंत्रण हा मुद्दा असल्याचं दिसून येत आहे. देशातील एका दाम्पत्यानं दोनं मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणणं गरजेचं असल्याचं वक्तव्य संघाचे संघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.  उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.

लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हा कायदा आमलात आणणं आवश्यक आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला नियंत्रण आणता येईल. हा कायदा देशात आणण्यासाठी संघाची आग्रही भूमिका असेल. या कायद्याविषयीची जनजागृती मोहिमही राबवली जाणार असल्याचं, मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

लवकरच भव्य राम मंदिराची स्थापन करण्यात येईल. मंदिराची स्थापना झाल्यावर राम मंदिराची ट्रस्ट स्थापन झाली की संघ राम मंदिराच्या मुद्द्यापासून वेगळा होईल, असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देशात 130 कोटी जनता हिंदूच आहे, असं वक्तव्य भागवत यांनी गेल्या डिसेंबर महिन्यात केलं होतं. त्यावरून त्यांना विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधक काही वाद निर्माण करतात का?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंनी इरादा बदलताच जुने भिडू पक्षात परत?? या दोन महत्वाच्या नेत्यांनी घेतली भेट

…म्हणून आमदार महेश लांडगेंच्या डोळ्यात पाणी आलं- चंद्रकांत पाटील

राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे?; आदित्य ठाकरेने दिले हे उत्तर…

“जेव्हा मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी केली तेव्हा गप्प का होता?”

संजय राऊतांनी तसं वक्तव्य करायला नको होतं- शरद पवार