“कत्तल खान्यापर्यंत गाय पोहोचवणारे हिंदूच ठेकेदार”

पुणे | समाज गायीच्याबाबतीत जागृत झाला तर कोणीही गाय कापायला पाठवणार नाही. कत्तल खान्यापर्यंत गाय पोहोचवणारे ठेकेदार हिंदू असतात, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.

जेव्हा गायीचं वैज्ञानिक महत्व समजेल त्यावेळी गायी कत्तलखान्यापर्यत जायच्या नाहीत, असंही मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

गाय कापली जाते ही समस्या नाही तर गायीला आपण माता मानत असताना. कोणी गाय पाळायला तयार नाही ही समस्या आहे. प्रत्येक घर गो पालक झाले पाहिजे आणि प्रत्येक घर गायीचं संरक्षक बनलं पाहिजे, असं अवाहन भागवत यांनी केलं.

दरम्यान, भारतातील सर्व समाज गायी प्रति जागृत झाला, तरच गायीची समस्या मुळापासून संपुष्टात येईल. गोसंवर्धन, गोपालन कसं करायचे याचं उदाहरण आम्हाला उभं करायचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित आणि सर्वंकष प्रयत्न करणं गरजेचं आहे.

महत्वाच्या बातम्या-