“नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती, भंगारवाला करोडपती कसा झाला?”

मुंबई | मंत्री नेते नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटींची संपत्ती आहे. त्यांच्या एकूण 22 संपत्ती आहे, असा गौप्यस्फोट करतानाच भंगारवाला करोडपती कसा झाला?, असा सवाल भाजप नेते मोहित भारतीय यांनी केला आहे.

नवाब मलिक यांच्याकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती आहे. त्यांच्याकडे एकूण 22 संपत्ती आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब फॅमिली ट्रस्टच्या नावाने जोडले गेले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.

करोडपती कसा झाला हे राज्यातील जनतेला कळायला हवं, असं भारतीय म्हणाले. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.

हॉटेल हे लोकांसाठीच असते. चहापाणी घेण्यासाठी आणि जेवण करण्यासाठी लोक हॉटेलात जात असतात. नवाब मलिक कधी फाईव्ह स्टार हॉटेलला गेलेच नाहीत का?, असा सवाल त्यांनी केलाय.

मलिकांनी जनतेला फिरवण्याचं आणि दिशाभूल करण्याचं काम बंद करावं. नटबोल्ट कुणाचं ढिल्लं होणार आणि कोण पाणी पाणी होईल हे आज त्यांना कळेलच, असंही ते म्हणालेत.

आता एनसीबीने मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे कुणावरही आरोप होणार नाही. नॅशनल, इंटरनॅशनल अशा सर्व अंगानी आता तपास होईल. आता नवे अधिकारी तपास करणार आहेत. त्यांचंही बर्थ आणि मॅरेज सर्टिफिकेट काढण्याचं काम होईल, असा टोलाही त्यांनी मलिक यांना लगावला.

मलिक यांनी आमच्यावर 100 आरोप केले. पण एकाही आरोपावर पुरावा दिला नाही. ते खासगी त्रासाचा सूड उगवत नाही का? त्यांचे नॅरेटिव्हज सर्व खोटे आहेत. असं राजकारण यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं, असं ते म्हणाले. माझ्या कुटुंबावर आरोप होत होते. तेव्हा भाजपने मला साथ दिली, असंही त्यांनी सांगितलं.

आज नवाब मलिक यांची मी सगळी पोलखोल करणार आहे. त्यानंतर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. उत्तरे देण्याचीही त्यांची लायकी उरलेली नसेल, अशी टीका त्यांनी केलीये.

राज्यात सलीम-जावेदने चित्रपट सुरू केला होता. त्याचा द एन्ड मीच करणार. आज सलीम-जावेदच्या चित्रपटाची खरी स्क्रिप्ट आणि खरा चेहरा जगासमोर येणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

‘हा देश कोरोना संसर्गाचं केंद्र ठरेल’; WHO ने दिला गंभीर इशारा 

राकेश झुनझुनवाला यांनी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये तासाभरात कमावले ‘इतके’ कोटी!

“हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल, त्यांना कळणारही नाही” 

आर्यन खान प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवताच नवाब मलिकांचं सूचक ट्विट, म्हणाले…