मुंबई | सर्वात दारू पिणारे लोक हे भाजपमध्ये असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर सडकून टीकास्त्र सोडलं होतं. यावरून नवा वाद रंगला आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या टीकेला भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
आर्यन खान प्रकरणापासून नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्यामध्ये वाद सुरु असून आता मलिक यांनी केलेल्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर कंबोज यांनी मलिकांवर पुन्हा टीका केली आहे.
हर्बल टोबॅकोचा वापर एखाद्या व्यक्तीने रोज केला, त्यातही सकाळ संध्याकाळी केला तर त्या व्यक्तीच्या मानसिक संतुलनावर परिणाम होतो, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
ज्या प्रकारचं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलंय ते रोज हर्बल टोबॅको वापरुन झालेल्या परिणामामुळे झालंय, असं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
रोज ते हर्बल टोबॅकोचा वापर करत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झालाय. या अती वापराने त्यांच्या मेंदूमधील नसांना नुकसान झालं आहे. त्यामुळेच ते या पद्धतीच्या फालतू गोष्टी बोललेत. अशी वक्तव्य एखादा संतुलन बिघडेलेला व्यक्तीच करु शकतो, अशी टीका कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर केली आहे.
ज्यांचा स्वत:चा जावई आणि घरातील व्यक्तींचा गांजा प्रकरणाशी संबंध आहे. गांजा विक्री, तस्करीशी ज्यांच्या नातेवाईकांचा संबंध आहे ते काय दुसऱ्यांकडे बोटं दाखवत आहेत, असंही मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.
भाजपचे अनेक नेते मद्यनिर्मिती उद्योगामध्ये आहेत. अनेक नेत्यांची वाइन विक्री आणि मद्यविक्रीची दुकानं आहेत. काही लोकांचे बार आहेत. सर्वात जास्त दारू पिणारे लोक हे भाजपत आहेत. त्यांची तर एक नेता सांगतेय की थोडी थोडी पित जा, असंही नवाब मलिक म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
‘ती इतर पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवू शकते’; ‘या’ जोडप्याने केला अजब करार
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे ताजे दर
‘तीन कोटी गरीब लखपती झाले’; पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य
10वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; परीक्षेशिवाय 561 जागा भरणार
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड, 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास