भारतीय गोलंंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट

मुंबई |  टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या अडचणी वाढल्या आहेत. पत्नी हसीन जहाँने कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केल्याने शमीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

पश्चिम बंगालच्या अलीपूर कोर्टाने हे वॉरंट जारी केलं आहे. क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीद अहमद या दोघांविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

सरेंडरसाठी त्याला कोर्टाने 15 दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत शमी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करु शकतो, असंही कोर्टाने म्हटले आहे.

शमीविरोधात आणि त्याच्या भावाविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याने त्याच्या अडचणींमध्ये भर पडली आहे.

महत्वाच्या बातम्या-