पुणे : लोकांना माझ्याबाबत चुकीची माहिती सांगून भावनेचं राजकारण केलं… कुठं आहेत ते आता?? ते जिथे जातायेत तिथले लोकं पक्ष सोडून चाललेत, असं म्हणत शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हेंवर टीकास्त्र सोडलं होतं. अमोल कोल्हेंनी आढळरावांच्या या टीकेला खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे.
आढळराव पराभवाच्या नैराश्यातून बोलत असून जनतेनं त्यांनी दिलेल्या सक्तीच्या निवृत्तीचा त्यांनी आनंद घ्यावा, असं प्रत्युत्तर अमोल कोल्हेंनी दिलं आहे.
शिवस्वराज्य यात्रा संपली की राष्ट्रवादीही संपेल, अशी घणाघाती टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हेंवर केली होती.
अमोल कोल्हेंना निवडून देऊन लोकांना पश्चाताप झालाय. त्यांनी मतदारसंघात भावनेचं आणि जातीय समिकरणाने राजकारण केले, असा आरोप आढळरावांनी कोल्हेंवर केला होता. याचाच अमोल कोल्हेंनी समाचार घेतला आहे.
दरम्यान, फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावावर भावनेचं आणि जातीय राजकारण केलं गेलं, असंही आढळराव म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीच्या पापाचा घडा भरला आहे- सुजय विखे पाटील- https://t.co/uJJcAeSLeg #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019
…अशी मागणी जगात कोणीही केली नसेल- पंकजा मुंडे- https://t.co/2SY3yK31pW #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 11, 2019
ओला उबेरमुळे वाहन क्षेत्रावर मंदी; अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचं तर्कट https://t.co/uCko3YnyCh @nsitharaman
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 10, 2019