Top news देश

‘पैसे से दवा खरीदी जा सकती है स्वास्थ्य नही’; ‘या’ माजी पंतप्रधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Photo Credit- Twitter/@hvgoenka

नवी दिल्ली |  कोरोना काळात अनेक राजकीय नेते सध्या सुरू असलेल्या कोरोना या महाभयंकर आजारावर भाष्य करत असतात. त्यांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अशातच दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांचे विचार आजच्या घडीलाही उपयोगी पडतील असे आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये वाजपेयी म्हणत आहेत की, पैसे सें दवा खरीदी जा सकती हैं स्वास्थ्य नहीं खरीदा जा सकता. तसेच भौतिक सुखं पैशाने विकत घेता येतात. वैज्ञानिक प्रगतीने माणूस वेगवेगळी शिखरं पादाक्रांत करतो पण या धरतीवर कसं चांगल्या पद्धतीने जगायचं हे त्याला उमगत नाही. हे शिक्षण, हे संस्कार कोण देणार?, असा सवालही ते करत आहेत.

आपण वर्तमानात जगतोय, पण आपल्याला भविष्याकडे बघावं लागेल. आपण गोवर, क्षय या रोगांवर विजय मिळवला. अगदी चंद्रापर्यंत पोहोचलो. पण इथे पृथ्वीवर जिवंत कसं राहायचं कसं जगायचं हे अजून कळत नासल्याचंही ते म्हणत आहेत.

मनात दुःख, भीती, पीडा असेल. बैचैनी असेल तर साक्षात कुबेराची संपत्तीसुद्धा सुखाचा आनंद देणार नाही. विज्ञान जीवन समृद्ध करतो तसं विनाशसुद्धा करू शकतो, असंही वाजपेयी म्हणाले आहेत.

हा व्हिडीओ ‘हर्ष गोयेंका’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘Such words of wisdom from Atal ji’ असं कॅप्शनही दिलं आहे. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजवळ 83 हजार लोकांनी पाहिला आहे.

IMPIMP