सर्व धार्मिक स्थळांचा पैसा गरिबांसाठी वापरावा; प्रकाश आंबेडकर यांची मागणी

पुणे | कोरोनाने कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. गरीब आणि मजूर वर्गाचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांकडे जो पैसा आहे तो गरीब माणसांच्या उपजीविकेसाठी खर्च करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

धार्मिक स्थळांचा पैसा हा सरकारचा पैसा आहे आणि देशातील धार्मिक स्थळे ही सरकारची आहेत. त्यामुळे सरकारने हिम्मत दाखवून धार्मिक स्थळांकडचा सर्व पैसा ताब्यात घेऊन लोकहितार्थ त्याचा वापर करावा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

केंद्र सरकारने नुकतीच पॅकेजची घोषणा केली आहे, हे पॅकेज खोटे, फसवे आहे. केंद्राचं पॅकेज म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचा भात असल्याची टीका प्रकाश त्यांनी केली. तसंच भारतात कोरोना येण्याला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरलं आहे.

लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती, यात अनेक मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात वंचित बहुजन आघाडी सामील असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले? किती रुग्णांना मिळाला डिस्चार्ज???

-घरच्या अंगणाला रणांगण बनवणं याला शहाणपण म्हणत नाही; अजितदादा भडकले

-कोरोना परिस्थितीबाबत राज्यपालांनी बोलावली होती बैठक; मुख्यमंत्री जाणार नाहीत!

-…तर मुख्यमंत्री महोदय चुकीला माफी नाही; भाजपचा इशारा

-रेल्वेनंतर विमानसेवा देखील सुरू होणार, या तारखेपासून विमाने उड्डाण घेणार…