राज्यात ‘या’ दिवशी दाखल होणार मान्सून, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई | सध्या मोठ्या प्रमाणात उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. अशात हवामान विभागाकडून मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात 7-8जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर 15 जून पर्यंत सर्व महाराष्ट्रभर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख अनुराग कश्यपी यांनी मान्सूनबाबत सांगितलं आहे. शेतकरी यंदाही मान्सून चांगला बरसण्याची अपेक्षा करत आहेत.

केरळमध्ये मान्सून 27 तारखेला दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच मान्सूनचा महाराष्ट्रातील प्रवास हा जूनच्या मध्यावधीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात गेल्या दोन दिवसांपुर्वी पाऊस देखील पडल्याचं पाहायला मिळालं होतं.

20 मे नंतर राज्यातील काही भागात परत एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. तर 26  मेपासून महाराष्ट्रात मान्सूनपुर्व पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील काही भागात 17 ते  21मे दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 महिला नगरसेवक आमने-सामने; मिरा-भाईंदर महापालिकेत जोरदार राडा

“जगू द्याल की नाही?”; राज ठाकरेंचा संतप्त सवाल

 संभाजीराजेंचा राज्यसभा मार्ग खडतर?, शिवसेनेनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, दिला ‘हा’ गंभीर इशारा

रोहित पवारांच्या खोचक टीकेला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले…