मुंबईत खरंच लॉकडाऊन लागणार?, एका दिवसात आढळले तब्बल ‘इतके’ रूग्ण

मुंबई | गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा धुमाकुळ घालायला सुरूवात केली आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा सर्वाधिक आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकिककडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना सर्वात जास्त रूग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत त्यामुळे भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. कोरोना रूग्णांची आकडेवारी वाढतच गेली तर नाईलाजाने मुंबईत लॉकडाऊन लावावं लागेल, असा इशारा मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिला होता.

मुंबईत कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा जर 20 हजारांच्या पुढे गेला तर मुंबईत लॉकडाऊन करण्यात येईल, असं वक्तव्य इकाबाल चहल यांनी केलं होत. त्यामुळे मुंबईत खरंच लॉकडाऊन लागणार का?, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

एकिकडे आयुक्तांनी लॉकडाऊनचा इशारा दिला तर दुसरीकडे मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येने 15 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे मुंबईत आता खरंच लॉकडाऊन लागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बुधवारी मुंबईत 24 तासात 15,166 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 13,195 रूग्णांमध्ये कोणतेही लक्षणं आढळून आले नाहीत.

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी बरे झालेल्या रूग्णांचा दर हा 90 टक्के आहे. मुंबईतील सध्याचा रूग्ण दुपटीचा दर हा 89 दिवसांवर आहे.

29 डिसेंबर 2021 ते 4 जानेवारी 2022 या कालावधीत मुंबईतील एकुण कोरोना वाढीचा दर हा 0.78 टक्के आहे. तर मुंबईत सध्या 20 सक्रिय कंटेन्मेंट झोन असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 20 हजारांच्या पुढे गेली तर मुंबईत लॉकडाऊन लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

मनी हाईस्टच्या ‘स्टाॅकहोम’ने घरी लावली गणपतीची पेंटिंग; फोटो तुफान व्हायरल

पालकांनो काळजी घ्या! लहान मुलांमध्ये ओमिक्राॅनची ‘ही’ लक्षणं दिसतात

चिंताजनक! फक्त 2 दिवसात नव्या रूग्णसंख्येत दुप्पटीने वाढ; वाचा आकडेवारी

“नाना मोदींबद्दल तोंड सांभाळून बोला”, चंद्रकांत पाटलांचा सज्जड दम

मोदींचा ताफा अडवला अन् ‘फुलराणी’ भडकली, म्हणाली…