दहावी, बारावीच्या 50 हजारांहून अधिक विद्यार्थांचा ऑफलाईन परीक्षेला नकार…..

मुंबई | नुकतचं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी, बारावी परीक्षा ऑफलाईन होणार आहे हे आता निश्चित झालं आहे. परंतु काल आणि परवा झालेल्या मोजणीमध्ये कोरोना व्हायरसने आता 10 हजाराचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या या वाढत्या संसर्गामुळे पालक आणि विद्यार्थी आगामी एसएससी, एचएससी बोर्ड परीक्षा 2021 बद्दल काळजीत आहेत. बरेच विद्यार्थी ऑफलाईन परीक्षेच्या शक्यतेवर घाबरले असून परीक्षा रद्द करण्याबाबत शिफारस करत आहे.

शिक्षणमंञी वर्षा गायकवाड हे ऑफलाईन परीक्षांवर ठाम असल्याने दहावी, बारावीचे जवळपास 52 हजार 558 विद्यार्थी परीक्षा न देण्याचा विचार करत आहे. एकून 69 हजार 752 विद्यार्थी परीक्षेवर ठाम असल्याचे दिसून येते. जरी परीक्षा देणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी अद्याप 36 हजार 291 विद्यार्थी परीक्षा द्यावी का नाही या संभ्रमात आहेत.

राज्यामध्ये ऑनलाईन मोफत शिक्षण देणाऱ्या अनेक अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील पालक आणि शिक्षकांनी परीक्षेपूर्वी एक सर्वे घेतला. या सर्वेक्षणाला राज्यातून तब्बल 1 लाख 601 विद्यार्थ्यांनकडून प्रतिसाद मिळाला. राज्यातील 36 जिल्हात केलेला हा सर्वे शिक्षक दिनेश गुप्ता यांनी सांगितला असून शिक्षणमंञ्यापर्यंत पाेहचवण्याची त्यांची इच्छा आहे.

राज्यात 36 जिल्हातील एकूण 1 लाख 601 विद्यार्थ्यी या सर्वेक्षणात सहभागी झाले. त्यात बारावीचे 71 टक्के म्हणजे 1 लाख 794 विद्यार्थी, तर 36 हजार 134 दहावीचे विद्यार्थी होते. 9 हजार 676 विद्यार्थी इतर इयत्तांचे होते. वर्षभर होत असलेल्या ऑनलाईन शिक्षणाबद्दल अनेक विद्यार्थी असमाधानी असल्याने 69 टक्के विद्यार्थांनी नकारात्मक मत मांडले.

ऑफलाईन परीक्षा व्हावी का ऑनलाईन व्हावी? या प्रश्नाला 61 टक्के विद्यार्थांनी ऑनलाईन परीक्षा घ्यावी, 20 टक्के विद्यार्थांनी कशीही परीक्षा घेतली तरी चालेन असा प्रतिसाद दिला. तर 19 टक्के विद्यार्थांनी परीक्षा लेखीच असावी, असे मत व्यक्त केले. लवकर परीक्षा होत असून अजून अभ्यासक्रम कमी करावा असं मत 84 टक्के विद्यार्थांनी सांगितले. 79 टक्के विद्यार्थांनी परीक्षा एप्रिल-मे महिन्यात न घेता पूढे ढकलाव्या असा प्रतिसाद दिला आहे. लेखी परीक्षा असल्यास परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी वाहतुकीची सोय नसल्याचे 53 टक्के जणांचे म्हणणे आहे.

एप्रिल – मे  महिन्यातील परीक्षेत अभ्यासक्रम 25 टक्के केलाय. राज्य शिक्षणाच्या ऑफलाईन परीक्षा पद्धत या निर्णयावर आपण समाधानी आहात का, या प्रश्नावर 79 टक्के विद्यार्थी म्हणजे 1,24,769 विद्यार्थी संतुष्ट नसून, फक्त 20 हजार 144 विद्यार्थी समाधानी असल्याचे नोंदविेले आहे. परीक्षेबद्दल 13 हजार 688 विद्यार्थी अजूनही गोंधळलेले दिसून येतात.

राज्यशासनाने विद्यार्थांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं पाहीजे, त्यांचा मनस्थितीचा विचार करावा. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घ्यावा.

महत्वाच्या बातम्या-

अमृता फडणवीसांच्या नवीन गाण्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

जसप्रीत बुमराह लवकरच अडकणार लग्नबंधनात; ‘या’ ठिकाणी करणार लग्न

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण?; रणधीर कपूर यांनी केला खुलासा, म्हणाले…

हजाराच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री! ‘या’ व्यापाऱ्याची ऑफर

‘सगळी सोंग आणता येतात, पण…’; अजित पवारांच शिवसेनेच्या सामनातून तोंडभरुन कौतुक