नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court of India) आदेशावरुन गुजरात न्यायालयाने (Gujarat Court) बिल्कीस बानो प्रकरणातील 11 दोषींची सुटका केली होती. त्यांनंतर देशात त्यांच्या सुटकेवरुन वादंग उठले आहे.
या सुटकेवर देशात नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. बिल्कीस बानो (Bilkis Bano) यांना देखील या सुटकेचा धक्का बसला आहे. त्यांनी केलेल्या कृत्यावर त्यांची मुक्तता केल्याने मला धक्का बसला, असे बानो म्हणाल्या.
न्यायव्यवस्थेवरील माझ्या श्रद्धेस धक्का पोहोचला असून विश्वास डळमळला आहे, अशी प्रतिक्रिया बिल्कीस बानो यांनी दिली आहे. यावर आता मानवाधिकार कार्यकर्ते आणि इतिहासकार यांनी भाष्य केले आहे.
मानवाधिकार कार्यकर्ते, इतिहासकार यांच्यासह प्रसिद्ध मंडळींनी निवेदन करुन दोषींच्या सुटकेचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल सहा हजार जणांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
दोषींची सुटका करणे हा अन्याय असून त्यांनी केलेल्या गुन्हाची दाहकता लक्षात घेता ते न्यायाशी प्रतारणा होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. सहा हजार जणांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.
सामान्य नागरिक, कामगार, मानवाधिकार कार्यकर्ते प्रसिद्ध लेखक, इतिहासकार, विद्वान, चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार यांनी त्यांच्या सुटकेच्या निर्णयावर भाष्य करत त्यांची सुटका रद्द करावी, असे सांगितले आहे.
सहेली विमेन रिसोर्स सेंटर, गमना महिला समूह, बेबाक कलेक्टिव्ह, ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह विमेन असोशिएशन या महिलांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी देखील यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
संजय राऊतांबाबत ईडीच्या तपासात महत्त्वाची माहिती उघड
“राष्ट्रवादीतील या पाच बड्या नेत्यांची चौकशी करायची आहे”
मोठी बातमी! श्रीवर्धन समुद्र किनारी संशयास्पद बोट आढळल्याने खळबळ
मेहबुबा मुफ्तींचे मोंदीवर गंभीर आरोप; म्हणाल्या, आमच्या राज्याला…
बिहारमध्ये पुन्हा राजकीय भूकंप येणार? प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी