“भाजपमध्ये दहापेक्षा अधिक आमदार नाराज असून राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे”

मुंबई | 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टीला राज्यातील राजकारणात एकामागून एक धक्के सहन करावे लागत आहेत. 2019 नंतर भाजपच्या अनेक बड्या बड्या नेत्यांनी पक्षाला राम राम ठोकत इतर पक्षात प्रवेश केले आहेत. यामुळे भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.

अशातच आता येत्या काळात आणखीही काही नेते भाजपला राम राम ठोकतील, असा ईशारा राष्ट्रवादी नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. मुंबईत एका वृत्त माध्यमाशी बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत मेगा भरती होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, गेले काही दिवस अनेक सदस्य चर्चा करत आहेत. भाजपचे हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा अधिक सदस्य नाराज आहेत. उबग आलेली आहे.

त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे. याबद्दल लवकरंच निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादीत येत्या काळात लवकरंच मेगा भरती होण्याची शक्यता आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकरणात एकंच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. नुकतंच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये भाजप पक्षाचा चांगलाच पराभव झाला आहे. निवडणुकीतील पराभवामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह चालल्याचं आता समोर आलं आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची जबाबदारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर होती. मात्र, या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काही भाजप नेते करत आहेत.

पक्षातीलच नेत्यांनी अशी मागणी केल्यानं आता पाटलांसमोर होम पीचवरच आवाहन उभे राहण्याची शक्यता आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा आणि हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील या नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजीतराजे घाटगे यांनीही राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी या नेत्यांनी केली आहे. तसेच कोल्हापूर मधील भाजप कार्यकर्त्यांनी देखील पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

पंकजा मुंडे आणि रोहित पवारांनी एकत्र काम करण्यासाठी भाजपच्या सुजय विखे पाटलांची साद, म्हणाले…

विधान परिषदेत मारहाण! धक्काबुक्की करत उपाध्यक्षांनाच खुर्चीवरून खाली खेचले; पहा व्हिडिओ

मोठी बातमी! ‘या’ माजी आमदाराला पुणे पोलिसांकडून अ.टक;

सारा अली खानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, वरून धवनसह रणवीर सिंगनं देखील केलं ट्रोल!

चंद्रकांत पाटील भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार? भाजप नेते म्हणाले…