कोरोनाच्या भीतीने आईचा जीव कासावीस; मुलाला केलेला कॉल व्हायरल…

पुणे |  कोरोना व्हायरसने अनेकांची तहान भूक पळवलीये. पुण्यात कोरोनाचे पाच रूग्ण सापडलेत. अशातच पुण्यात शिक्षण घेणाऱ्या एका मुलाला त्याच्या आईने गावाकडून केलेला फोनकॉल चांगलाच व्हायरल होत आहे. “”माझ्या बाबा तू आताच्या आता पुण्यातून गावाकडं ये…. मी तुझ्या पाया पडते, असं त्याची आई त्या मुलाला विनवणी करत आहे. डोळ्यात पाणी आणणारा हा फोनकॉल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मुलाला फोनवर आई म्हणतीये-

“पुण्यात असा रोग आलाया की त्याज्यावर उपचारसुदा नाहीती.. ये रं माझ्या बाबा…. लवकर घरी यं… तू कायबी काळजी करू नको… मी तुला आयुष्यभर बसून खायाला घालते… नाष्टा कर आणि लगीच बॅग भरून गावाकडे निघ… मी तुला एक शब्दसुदा बोलत नाय.. मी रोज करून घालते तुला…”,

मी टीव्हीला बघितलंय… कोरोनाच्या माणसांना मारून टाकत्याती… त्याज्यामुळं तू लवकर घरी ये… हे सगळं गेलं की मग वाटलं तर परत पुण्याला जा…. अश्या काळजीच्या भावना तीने व्यक्त केल्या आहेत.

ग्रामीण भागातून पुण्या-मुंबईला आलेल्या मुलांना फोन करण्याचं ग्रामीण भागातल्या कुटुंबियांचं प्रमाण देखील वाढलं आहे. फोन करून सतत तब्येतीकडं लक्ष देण्याचा सल्ला कुटुंबीय देत आहेत, असं पुण्यात एका शिक्षण घेत असलेल्या मुलाने सांगितलं.

पुण्या-मुंबईत शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने अनेक तरूण तरूणी आहेत. कोरोना आता महाराष्ट्रात आल्याने त्यांच्या आईवडिलांना आपल्या मुला-मुलींची काळजी लागलेली आहे. त्यामुळे एका आईचा कॉल जरी व्हायरल होत असला तरी भावना मात्र सगळ्या आयांच्या सारख्या आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

-“काका जरा जपून महाराष्ट्रातही धक्का बसायचा”

-पुण्यात ‘रंगाचा झाला बेरंग; दोन गटात तुफान राडा!

ज्योतिरादित्य शिंदेंना भाजपमध्ये काय मिळणार?, हे पाच आहेत पर्याय

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या कार्यक्रमापूर्वी औषध फवारणी

-कोरोनाबाबत असहकार्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही- छगन भुजबळ