मुंबई : Motorola One Power हा लिनोवोचा नवा फोन भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. आजपासून या फोनसाठी रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आलं आहे. फक्त फिल्पकार्ट या ई-कॉमर्स साईटवर या फोनची विक्री होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून ग्राहकांच्या हातात हा फोन मिळण्यास सुरुवात होईल. या फोनची विशेषता म्हणजे स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर, 5000 mAh क्षमतेची जबरदस्त बॅटरी, डिस्प्ले नॉच आणि दोन रिअर कॅमेरे… या फोनला भविष्यात अँड्रॉईड अपडेट्ही मिळणार आहे. मोटोरोलाला मंगळवारी 90 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे आगामी फोनसाठी त्यांनी थेट गुगलसोबत भागीदारी केली आहे. ग्राहकांना जबरदस्त फोन देण्याचा मोटोरोलाचा प्रयत्न आहे.
मोटोरोला One Powerची टक्कर कुणाशी?
Motorola One Power ची थेट टक्कर शाओमी रेडमी नोट 5 प्रो, असुस झेनफोन मॅक्स प्रो M1 तसेच नोकिया 6.1 प्लस या फोनसोबत होणार आहे. लिनोव्होने Motorola One Power हा फोन सर्वात अगोदर आयएफए शो-2018 मध्ये सादर केला होता.
मोटोरोला One Powerची किंमत किती?
Motorola One Power ची भारतीय बाजारात किंमत 15999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचं एकच व्हेरिएंट सध्या उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेजमध्ये त्यामध्ये ग्राहकांना मिळणार आहे. 5 ऑक्टोबरपासून फोनची विक्री सुरु होणार आहे, मात्र यासाठी ग्राहकांना नोंदणी करणं गरजेचं आहे. हा फोन फक्त फ्लिपकार्टवर मिळणार आहे.
मोटोरोला One Powerची वैशिष्ट्ये काय?
-अँड्रॉईड 8.0 सिस्टम
-डिस्प्ले- 6.2 इंच आकाराचा फुल्ल HD डिस्प्ले
– प्रोसेसर- ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 636
– रॅम- 4GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेज
-कॅमेरा- ड्युअल रिअर कॅमेरा, ज्यामध्येे प्रायमरी कॅमेरा 16 मेगापिक्सेल तर सेकंडरी सेन्सर 5 मेगापिक्सेलचा असेल
– फ्रंट कॅमेरा- 12 मेगापिक्सेल
-बॅटरी- 5000mAh क्षमतेची बॅटरी फास्ट चार्जिंगच्या वैशिष्ट्यासोबत