निकालाच्या 12 तास अगोदर गोव्यात हालचालींना वेग; काँग्रेसचे दिग्गज नेेते गोव्यात दाखल

पणजी | अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता काही तास शिल्लक बाकी आहेत. परिणामी राजकीय पक्षांची पळापळ चालू आहे.

पंजाब, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मणिपूर या पाच राज्यातील 600 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता मतमोजणीची प्रतिक्षा केली जात आहे.

पाचपैकी चार राज्यात सध्या भाजप तर एका राज्यात काॅंग्रेस सत्तेत आहे. काॅंग्रेसला आता चार राज्यात सत्ता येण्याची अपेक्षा आहे. परिणामी काॅंग्रेस हायकमांडने गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यात आपले दिग्गज नेते पाठवले आहेत.

गोव्यात काॅंग्रेस सत्तेच्या जवळ जाण्याचा अंदाज विविध इक्जिट पोलद्वारे वर्तवण्यात आला आहे. परिणामी ज्येष्ठ काॅंग्रेस नेते पी. चिदंबरम आणि डी.के शिवकुमार हे गोव्यात दाखल झाले आहेत.

2017 साली सर्वाधिक जागा जिंकून देखील काॅंग्रेस सत्तेपासून बाजूला झाली होती. काॅंग्रेसला अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका गतवेळी बसला होता.

अवघ्या 13 जागा जिंकणाऱ्या भाजपनं दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं होतं. मात्र यावेळी काॅंग्रेस कोणतीही चुक करण्याच्या मनस्थितीत नाही.

गोव्यात भाजपला सत्ता राखण्यासाठी यावेळी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. आप, तृणमुल काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस या पक्षांनी देखील आपले उमेदवार उभे केल्यानं भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काॅंग्रेसनं आपल्या सर्व उमेदवारांना एका हाॅटेलात नेल्याची सध्या माहिती येत आहे. परिणामी निकालाच्या आधीच आमदारांच्या पळवापळवीचा खेळ चालू झाल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“महाविकास आघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकणार नाही” 

देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…’माझ्याकडे पण…’ 

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी! 

“मुख्यमंत्री साहेब आता शेती परवडत नाही, वाईन विक्रीची परवानगी द्या” 

पुन्हा सत्तेत आल्यास योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, जाणून घ्या सविस्तर