पन्हाळ्यावर चित्रीकरण केल्यामुळे खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई |  महाराष्ट्र सरकारने गडकिल्ले भाडेतत्वावर देण्याच्या घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आणि सडकून टीकाही केली. पण त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाअगोदर त्यांनी पन्हाळा गडावर ‘मराठी टायगर्स’ या चित्रपटासाठी ‘हुरहुर लागे श्वासांना’ हे गाणं शूट झालं आहे, असं सांगत काही नेटकरी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.

गडकिल्ल्यांविषयी तुम्हाला एवढीच चाड आहे आणि पुळका आहे तर ‘हुरहुर लागे श्वासांना’ हे गाणं त्यावेळी पन्हाळ्यावर कशाला शूट केलं, असा सवाल त्यांना नेटकरी विचारत आहेत.

पन्हाळा गडावर हे गाणं कधी शूट झालं? त्यावेळी अमोल कोल्हे कुठल्या पक्षात होते किंवा ते आता कुठल्या पक्षात आहेत, यापेक्षा त्यांनी पवित्र गड-किल्ल्यांवर अशी गाणं चित्रित करण योग्य आहे का? असे सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.

दुसरीकडे अमोल कोल्हे यांनी मी ईव्हीएमविषयी मी बोलायला लागलो, की 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॉट्सअ‌ॅपवर मेसेज पाठवतात, असं म्हटलं आहे

दरम्यान, शासनाने गडकिल्ल्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयावर अमोल कोल्हे यांनी जोरदार टीका केली होती. जे औरंगजेबाला जमलं नाही ते या सरकारने करून दाखवलं, असं ते म्हणाले होते.

 

महत्वाच्या बातम्या-