“पंतप्रधानांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधात”

नवी दिल्ली | राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला असून येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीं उपस्थित असणार आहेत. मात्र  एमआयएमचे खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी मोदींच्या जाण्यावर टीका केली आहे.

पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे संविधानाच्या शपथेच्या विरोधातील आहे. धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा महत्त्वाचा भाग आहे. अयोध्येत 400 वर्षापर्यंत असणारी मशीद ही काही गुन्हेगारी संघटनांनी 1992मध्ये ती पाडली. आम्ही हे विसरलो नसल्याचं औवेसी यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र ज्या दिवशी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येत असतील, तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण असेल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून केलं जाणार आहे. त्याचबरोबर इतर वाहिन्याही कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणार आहेत, असं श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाविषयी सांगितलं आहे.

दरम्यान, सध्या बकरी ईदवरून राजकारण तापलं आहे. काही मुस्लिम नेते याचा विरोध थेट राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यावर आक्षेप घेत करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

पार्थ पवार आमदार होणार का?; राष्ट्रवादीने केला खुलासा…

‘बकरी ईदला कुर्बानी द्यायचीच असेल तर आपल्या मुलांची कुर्बानी द्या’; ‘या’ भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य!

…तर आम्ही आजही पुन्हा शिवेसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत- चंद्रकांत पाटील

काय सांगता! ‘या’ कारणामुळे तुम्हाला आता भारतात पबजी खेळता येणार नाही!