मुंबई | गेल्या काही काळापासून शांत असलेलं राज्याचं राजकारण मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या वादळी सभांनंतर जोरदार पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगितुरा रंगला आहे.
राज ठाकरेंनी दोन महिन्यात तीन सभा घेत मशीदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याचं सर्वत्र बोललं जात आहे.
राज ठाकरेंनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना इशारा दिला होता. त्यावरून आता राजकारणात वाद वाढला आहे.
4 तारखेपर्यंत भोंगे उतरवा अन्यथा परिस्थितीचा सामना करावा लागेल, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर येऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर राजद्रोह आणि भडकावू भाषण देणाऱ्यांवर साधे कलम लावण्यात आली आहेत, असं जलील म्हणााले आहेत.
सगळ्यांनी मिळून सोपी कलमं लावली आहेत. कारवाई केली तरी फक्त थातुर मातुर कारवाई करू नका, असा सल्ला जलील यांनी सरकारला दिला आहे.
मला सरकारला विचारायचं आहे की 153 कलम लावले मग 153 अ का लावले नाही. उगाच दाखवायचे म्हणून कारवाई करण्यात येत आहे, अशी टीका जलील यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून राज ठाकरेंवर देशद्रोहाचं कलम लावण्यात आलं नाही, असा आरोप जलील यांनी केला आहे. परिणामी सरकार विरूद्ध एमआयएम संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…अन् प्रसिद्ध अभिनेत्याला न्यूजरूममधून अँकरने काढलं बाहेर; पाहा व्हिडीओ
“बाहेरून गुंड आणून मुंबईत गोंधळ करण्याचा डाव”; संजय राऊतांचे गंभीर आरोप
“अहो आदित्यजी अशा घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता, त्यामुळे इतिहास….”
“…तर आम्ही त्यांना सोडणार नाही”; भीम आर्मीचा राज ठाकरेंना गंभीर इशारा