…म्हणून शिवसेनेच्या वाघाची शेळी-मेंढी झालीय- नारायण राणे

पुणे :  बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत शिवसेना ही शिवसेना होती. पण, आता शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना महापालिकेत टक्केवारी घेऊन कामं केली जात आहेत, असं माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येतं, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून, शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत, अशी घणाघाती टीका नारायण राणे यांनी केली. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.

येत्या आठ दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली आहे. मात्र माझ्या भाजप प्रवेशासाठी शिवसेनाच आडकाठी आणत आहे, असा आरोप नारायण राणेंनी केला आहे.

शिवसेनेत दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतही मी सर्वाधिक लोकप्रिय होतो, अपवाद फक्त उद्धव ठाकरे यांचा.. त्यांना चांगलं दिसत नाही आणि चांगल्या व्यक्तीचे कौतुकही करवत नाही, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, शिवसेनेत आम्ही जेवढी आंदोलने केली ती उद्धव ठाकरेंना माहितीही नाहीत. आताची शिवसेना व्यवसायिक झाली आहे, असं नारायण राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-